भीमसैनिकांचा आक्रोश मोर्चा ढाणकी बाजारपेठ कडकडीत बंद

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये निषेध व्यक्त करण्यास येत असून आज ढाणकी शहरांमध्ये संविधान प्रेमी व भीमसैनिक यांनी आक्रोश मोर्चा काढून ढाणकी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आले
यावेळी ढाणकी येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्पृतिन आपले दुकाने बंद ठेवून ढाणकी बंदला पाठिंबा दिला,
बौद्ध विहारा पासून आक्रोश निषेध मोर्चा सुरुवात झाली हातात निळे झेंडे घेत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत हजारो भीमसैनिक मोर्चात सामील झाले जय भीम च्या गजराने ढाणकी शहर दणाणले मुख्य रस्त्याने निषेध मोर्चा

काढीत सराफा मार्केट संविधान चौक ते जुने बस स्टॅन्ड चौक येथे मोर्चा पोहोचून मोर्चाचे रूपांतर सभेत झाले, यावेळी आक्रमक आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी तब्बल तीन तास वाहतूक खळंबली, यावेळी प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली, अनेक वक्त्यांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध केला , सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा द्या, संपूर्ण प्रकरणाची न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करा, पुस्तकाच्या कुटुंबीयांना 50 लाखाची मदत देऊन परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी समावेश करा मागण्यांचे निवेदन बिटरगाव पोलीस स्टेशनचे स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार संतोष मनवर यांच्यामार्फत भारताच्या महामय राष्ट्रपती यांना देण्यात आले, यावेळी आयोजक जॉनटी विनकरे, रामराव गायकवाड, संबोधि गायकवाड, गोलू मुनेश्वर, समाधान राऊत, ब्रह्मानंद मुनेश्वर, समाधान नरवाडे, अमोल पाटील, प्रकाश कांबळे, तुळशीराम गायकवाड, सुनील राऊत, राजू पाटील, विलास गायकवाड, स्वप्निल चिकाटे, यांच्यासह हजारो भीमसैनिक व महिला उपस्थित होत्या या मोर्चाला काँग्रेस नेते बाळू पाटील चंद्रे, संजय कुंभारवार, खाजाभाई कुरेशी, ओम पाटील चंद्रे, प्रवीण जैन, एजाज पटेल , मनसे अध्यक्ष सादिक भाई यांनी या मोर्चात सहभागी होऊन परभणी येथील घटनेचा निषेध केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जॉनटी विनकरे, तर आभार प्रकाश कांबळे यांनी केले, बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठानेदार संतोष मणवर यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता