सामाजिक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रो डॉ अनिल काळबांडे यांना जाहीर

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड : महाराष्ट्रसह देश विदेशात नावाजलेले साहित्यिक ,विचारवंत प्रबोधनकार तथा आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रोफेसर डॉ . अनिल काळबांडे यांना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांना वेस्ट बंगाल राज्यातील डॉ . बी आर आंबेडकर अकादमी नेपालीया ‘ जि दाजीलिंग वेस्ट बंगाल येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लाइफटाइम अचीवमेंट नॅशनल एक्सलँस अवार्ड 2024 जाहीर झाला आहे .भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ ( दिल्ली ) यांच्या वतीने डॉ .बी आर आंबेडकर यांच्या लंडन येथील एम एस सी (अर्थशास्त्र व राज्यशास्त्र )11 ऑक्टोबर 1916 हा प्रवेश दिवस व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून / शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा लाभलेले जवळपास 14 वेळा विदेशांमध्ये मराठी भाषेचा प्रचार तथा आंबेडकरी विचाराचा साहित्य संमेलनातून विचार प्रेरणारे प्रोफेसर डॉ . अनिल काळबांडे यांच्या योगदानाबद्दल दिनांक २० ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना निपाणीया जिल्हा . दार्जीलिंग ,
वेस्ट बंगाल येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार दिल्ली रामदास आठवले , माजी मंत्री महाराष्ट्र प्रा . लक्ष्मण ढोबळे ,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनिअर सुरज सिंग त्याचबरोबर महासंघाचे अध्यक्ष इंजी.संजय कांबळे मुख्य आयोजक प्रा . गौरव साठे व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे . प्रो. डॉ . अनिल काळबांडे यांनी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक सेवेची वाटचाल सुरू केली .त्यामुळे त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यामध्ये अस्मितादर्श उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार ,प्रबुद्ध भारत साहित्यरत्न पुरस्कार, डॉ . बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार ,डॉ . बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार ,डॉ . बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलंस अर्वाड , दिल्ली प्रा . राजा ढाले वैचारिक लेखन पुरस्कार यासह देश विदेशात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचा अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!