दुर्गम भागातील कुरळी येथील पोमाजी करेवाड यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनचा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड तालुक्यातील बंदीभागातील दुर्गम भागातील नागरिकांच्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे निस्वार्थी व्यक्तिमत्व पोमाजी करेवाड यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशनच्या वतीने 2024 वर्षा करिता राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
करेवाड हे दुर्गम व ग्रामीण भागातील गरजू लोकांना आरोग्य विषयक व इतर कामांसाठी स्वतःचा वेळ व पैसा खर्च करून त्यांना मदत करतात या कारणाने ते बंदीभागातील सर्व लोकांना परिचित आहेत सामान्य लोकांच्या अडी – अडचणी जाणून घेऊन त्यावर सदर लोकांना मदत करून त्यांना त्यातुन दिलासा देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या कामासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फेडरेशन च्या वतीने 2024 चा राष्ट्रीय सन्मान पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. याबाबत बंदीभागातील व उमरखेड तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य हज समिति (राज्य मंत्री दर्जा)आसिफ खान, मानवाधिकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष इरफान मलनस, रेखाताई कोठेकर यवतमाळ जिल्हा महामंत्री भाजपा, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.*