वाघाने पाडला गायीचा फडशा( गोविंदपुर शिवारातील घटना शेतकरी भयभीत).

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
प्रतिनिधी वनपरिक्षेत्र विभाग उमरखेड अंतर्गत येत असलेल्या गोविंदपुरचे शिवारात गोठ्यावर बांधून असलेल्या गाईवर हल्ला करून वाघाने ठार मारल्याची घटना दिनांक 11 फेब्रुवारी 2024 सोमवार रोजी रात्रीचे दरम्यान घडली असून गोविंदपुर येथील शेतकरी शिवाजीराव बाळाजी भोयर यांचे शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या गाईला वाघाने ठार केले असून यात शिवाजीराव बाळाजी भोयर यांचे तब्बल पन्नास हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे याबाबतीत वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांच्याकडे या घटनेची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्याने दिली असून दाखल केलेल्या तक्रारीवरून वनपरिक्षेत्र वनविभाग उमरखेड चे कर्मचारी सुतारे व कराळे यांनी घटनेचा पंचनामा करून वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड यांच्याकडे अहवाल सादर केला आहे गोविंदपुर व आजूबाजूच्या परिसरात मागील एक महिन्यापासून वाघाने दहशत पसरविली असून यात अनेक शेतकऱ्यांचे पशुधन सदर वाघाने फस्त केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत याबाबतीत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सदर वाघाचा बंदोबस्त तातडीने करण्याची मागणी पुढे येत आहे