महागाव तालुक्यात काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नामो निशान होण्याच्या मार्गावर! (महागाव उंबरखेड मतदार संघाचे वार्तापत्र प्रतिनिधी संजय नागरगोजे)

मुख्य संपादक
उमरखेड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या साहेबराव कांबळे यांचा पराजय करून भाजपाचे किसनराव वानखेडे आमदार झाले ! त्यावेळेस निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते व शरद चंद्र पवार गट राष्ट्रवादी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे काम केले हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे भाजपचा विजय झाला त्यानंतर नवीन आमदार त्यांच्या कार्यकाळात सुरुवातीलाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे ! सहकारी संस्थां, जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्याच ताब्यात राहावी म्हणून इतर पक्षातील नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यासह सत्ताधारी पक्षात प्रवेश घेत आहे ! माझी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील व इतर छोटे मोठे कार्यकर्ते यांचा समावेश आहे. परंतु ग्रामपंचायत जिल्हा परिषद माध्यमातून गाव खेड्यांचा विकास करण्यासाठी आमदार हा महत्त्वाचा दुवा आहे ! पश्चिम महाराष्ट्रात अनेक वेळा विधानसभा निवडणुका लढविलेले किंवा प्रदीर्घ अनुभव असलेले नेतृत्व नेहमी जनता निवडून देते ! आपल्या जिल्ह्यात पुसद विधानसभा वगळल्यास उमरखेड विधानसभा मतदारसंघात नेहमीच नवखा उमेदवार जनता निवडून देत आहे ! समाजकारण , राजकारण करीत असताना कामाचा उरक आणि अनुभव महत्त्वाचा असतो ! आमदाराची विकास करण्याची प्रामाणिक इच्छा शक्ति जरी असली तरी लाल फीतशाही प्रशासकीय अधिकारी नवख्या आमदाराच्या अनुभवाहिनतेचा फायदा घेत त्यांना आपल्या नियंत्रणात आणून अधिकारी राज निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात ! शासकीय अधिकारी होण्यासाठी यूपीएससी एमपीएससी किंवा तत्सम प्रकारचं शिक्षण घेऊन पाच ते सहा वर्ष सतत अभ्यास करून तेव्हा तो प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू होतो ! आपल्या लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य मतदाराला जनता आमदार – खासदार म्हणून निवडून देण्याची व्यवस्था असल्यामुळे सर्वसामान्य मतदार जनतेच्या मतामुळे आमदार होऊ शकतो ! मतदार संघातील विकास कामे आणि प्रशासनाचा गाडा चालविण्यासाठी नवख्या आमदारांना तारावरची कसरत करावी लागते ! याचाच फायदा शासकीय अधिकारी घेतात ! आपल्या कुटुंबाची उन्नती जशी कुटुंबप्रमुखावर असते तीच जबाबदारी मतदार संघाचा विकास आणि प्रशासनाचा गाडा हाकतांना आमदाराची असते परंतु दुर्दैवाने उमरखेड मतदार संघात सतत अनुभव हीन आमदार जनता निवडून देत असल्यामुळे इतर प्रगत मतदारसंघाच्या तुलनेत आपण मतदार वीस वर्षे मागे आहोत ! मला कोणा एका राजकीय माजी – आजी आमदार, खासदारांना दोष द्यावयाचा नाही पण ! आपल्या मतदार संघाचा विकास करून घ्याव्याचा असेल तर जनतेचे कर्तव्य आहे की आपला आमदार – खासदार आणि आपल्या स्थानिक स्वराज्यसंस्थांचे पदाधिकारी आपण कसे निवडून देतो याचा विचार करण्याची पाळी जनतेवर नक्कीच आली आहे ! काँग्रेस चे काही पदाधिकारी व शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समिती तिकीट आपल्याला मिळावी म्हणून भाजपात प्रवेश घेतला आहे परंतु भाजपचे पहिले कार्यकर्ते यांचा विचार होणे तेवढेच महत्त्वाचे आहे तात्पुरते प्रलोभन महत्त्वाचे नाही हेच यावरून सिद्ध होते* .



