Uncategorized

हिवरी येथील पुलाजवळील रस्त्यालगत असलेल्या खड्ड्याची दुरुस्ती करण्याची संध्या रणवीर यांची मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


महागांव /काळी दौ दि 21 काळी दौ ते पुसद रोडवर हिवरी येथे शिप नदी पात्राच्या पुलाला लागून असलेल्या रस्त्या कडेला नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठी भेग पडली असून या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी असे निवेदन संध्या रणवीर तालुका अध्यक्ष नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस पी यांनी सहाय्यक अभियंता,सा बां विभाग महागांव तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना मेल द्वारे पाठवले आहे


सदरचा रस्ता हा नदी पुलाच्या कडेला नुकताच झालेल्या जोरदार पावसाच्या पाण्यामुळे माती खचुन रोड खाली खड्डा पडला आहे या रस्त्यावरून दिवसभर वाहने धावतात त्यामुळे यावर वजन पडल्याने हा पुलाखालील मातीचा भाग अजून खचून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.या बाबीची गंभीर दखल घेऊन रस्त्याचा पडलेला अपघाताला आमंत्रण देणारा खड्डा दुरुस्त करावा अशी जनहितार्थ मागणी निवेदनातून संध्या रणवीर यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!