तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद तरोडा शाळेने मिळवले यश

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
दिनांक एक तारखेला गोसी गावंडे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तालुकास्तरीय वैयक्तिक खेळ व क्रीडा प्रकारामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरोडा शाळेने योगासने, धावणे, बुद्धिबळ, थाळीफेक अशा विविध खेळ प्रकारांमध्ये मुले आणि मुली यांनी उत्कृष्टअशी अशी कामगिरी केली. मोहिनी पवार धावणे व थाळीफेक प्रथम , नव्या खंडाळे योगासने प्रथम , कल्याणी सावतकर बुद्धिबळ प्रथम , वीर पाटील योगासने प्रथम , आदित्य खंडाळे योगासने प्रथम , कल्याणी चव्हाण योगासन प्रथम, ईश्वरी खंडाळे बुद्धिबळ प्रथम विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या खेळ प्रकारासाठी गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे व गटशिक्षणाधिकारी सतीशजी दर्शनवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक केले. विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर मार्गदर्शन भारत खडसे, शिवाजी राठोड, संजय ईपर,विनोद सोनटक्के, प्रशिक नंदुरकर, संतोष चोंडे, संतोष वाढवे, कैलास वानरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गावातील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व सर्व गावकऱ्यांनी विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले