जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा( कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वीच केली कामाला सुरुवात).

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय उमरखेड च्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील ग्रामीण विकासाची पुरती वाट लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील बांधकाम उपविभागाला कायमस्वरूपी उपअभियंता नसल्यामुळे येथील उपविभागाचा कारभार हा प्रभारीकडे सोपविला गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत करण्यात येणारी कामे दर्जाहीन व निकृष्ट पद्धतीचे करण्यात येत असल्याचा आरोप सर्वसामान्यातून केल्या जात आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग अंतर्गत येणाऱ्या अंबाळी फाटा ते अंबाळी देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा कार्यारंभ आदेश मिळण्यापूर्वीच कंत्राटदाराने काम सुरू करून थातूरमातूर व निकृष्ट पद्धतीने डांबरी पॅचेस चे काम केल्यामुळे आज या रस्त्यावरील सर्व खड्डे जशास तसे झालेली असल्याचा आरोप उमरखेड येथील दर्पण पत्रकार संघाचे सचिव सचिव सतीश कोल्हे पत्रकार शेख जमीर व पत्रकार सुनील ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता यवतमाळ व उपविभागीय अभियंता उमरखेड यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून मागील दोन महिन्यापूर्वी केला होता व या तक्रारीतून संबंधितांनी चौकशीची मागणी केली होती परंतु येथील उपविभागीय अभियंत्याने या तक्रारीची कुठलीही दखल न घेता निकृष्टपणे काम करणाऱ्या कंत्राद्वाराची पाठराखण केल्यामुळे संबंधित तक्रार दार यांनी व्यथित होऊन दिनांक 25 जानेवारी 2024 पासून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड येथील कार्यालया पुढे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून दिला आहे याबाबतीत जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता संबंधित कामाची चौकशी करून यावर कोणती कारवाई करतात याकडे जनसामान्यांचे लक्ष लागल्याचे दिसत आहे एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचा कारभार प्रभारी उप अभियंता कडे गेल्यामुळे अशा प्रकारचे निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना रान मोकळे झाल्याचा आरोप सामान्यजणातून होत आहे