शैक्षणिक

आदर्श शिक्षक बाबाराव देवराये गुरुजीचा पाचवा स्मृतीदिन संपन्न

चौकट : क्रिएटिव्ह टीचर्स फोरमच्या वतीने आयोजन


शेख इरफान

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड येथे जिजाऊ भवन येथे क्रिएटिव्ह टीचर्स फोरम च्या वतीने राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बाबाराव विठोबा देवराये सर यांच्या पाचव्या स्मृती दिना चे निमित्त उमरखेड परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक हिरामण वास्कर सर,एच.एन.शिंदे सर,आर. एम.खान,रंजना ठाकूर मॅडम, बाना मारोती सावतकर सर तसेच संजय देशमुख सर मुख्याध्यापक, बिटरगाव खुर्द यांचा शाल पुस्तक व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऍड.विलासराव देवसरकर तसेच प्रमुख अतिथी संभाजी राणे सहा.आयुक्त तसेच प्राचार्य वि ना कदम सर ,यशवंत देशमुख, अरूणाताई चंद्रवंशी हे होते.पुसद येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यशवंत देशमुख सर यांनी आपले परखड विचार मांडले.त्यातून देवराय सर यांच्या कार्याचा परिचय करून दिला.या कार्यक्रमाचे यशस्वीते साठी सुरेश वाघ सर,डॉ. विनय चव्हाण सर,बाबाराव ईटकरे सर,प्रकाश दुधेवार सर , सर यांनी परिश्रम घेतले.संचलन सुरेश वाघ सर यांनी केले.व आभार प्रकाश दुधेवार सर यांनी मानले.समाजाप्रती देवराय सर यांचे योगदान एखाद्या कर्मयोग्याप्रमाने होते,असे अध्यक्ष ऍड.देवसरकर यांनी सांगितले.अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!