अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षक ठार

( सिंगल रोडवर भरधाव वाहनाने घेतला जीव )
शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : – आपल्या दुचाकी वाहनाने उमरखेड वरून सासरवाडी असलेल्या निंगणुर कडे जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना चुरमुरा गावापासुन तिन कीमी अंतरावर उमरखेड – फुलसावंगी रोडवर काल दि १३ डिसेबंर रोजी सायंकाळी ६ते ७ चे दरम्यान घडली . अत्यत शोज्वळ स्वभावाच्या शिक्षकाचा अपघाती मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे .
गणेश सिताराम खराटे (वय 40 )रा . जनुना ( वरुडबीबी) असे अपघातात मृत झालेल्या शिक्षकाचे नाव असुन काल दि . १३ रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकी वाहन होंडा साईन क्र एम एच २९ बी जी ५२८१ ने सासरवाडी असलेल्या निंगणुर येथे जात असतांना उमरखेड फुलसावंगी मार्गावर चुरमुरा गावाच्या समोर तिन की. मी . वर अज्ञात वाहनाने धडक दिली . धडक एवढी जबरदस्त होती की शिक्षकाचा जागीच मृत्यु झाला . मृत शिक्षक हे पार्वतीबाई नाईक वि .जा .भ .ज .प्राथमिक आश्रम शाळा कुरळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते सदर घटनेची माहीती वाटसरूंनी उमरखेड पो स्टे ला दिल्यानंतर पोलीसानी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्नालयात आणण्यात आला . सदर घटनेचा तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पि एस आय दिलीप शिरसाठ करत आहे .