डॉ . वि . ना . कदम यांना लोकसंवाद साहित्य संम्मेलनात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
उमरखेड : श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, तालुका उमरी च्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामिण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते यंदाही संमेलन गिरीश देशमुख गोरठेकर इंग्लिश स्कूल उमरी तालुका उमरी येथे १० डिसेंबर रोजी संपन्न झाले त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी उमरखेड तालुक्यातील गो .सी .गावंडे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ .वि .ना .कदम यांना देण्यात आला . डॉ . वि . ना . कदम यांनी झाड आणि झेंडा हे आत्मचरित्र लिहून या आत्मचरित्रातून सर्वसामान्य युवकांनी आदर्श घेऊन आपल्या जीवनात बदल घडवावा या उदात्त हेतूने हे आत्मचरित्र लिहिले त्यामुळे त्यांची दखल घेऊन त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला
१८ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनात या पुरस्काराची वितरण संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध विचारवंत प्रा .डॉ . पृथ्वीराज तौर उद्घाटक प्रा . डॉ . श्रीपाल सबनीस स्वागताध्यक्ष डॉ . विक्रम देशमुख तळेगावकर व मान्यवरांच्या उपस्थित मान्यवरांना पुरस्कार वितरित करण्यात आला .