“गाजर गवत निर्मुलनासाठी मेक्सिकन भूंग्यांचा वापर”

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
शेतकऱ्यांना नेहमीच डोकेदुखी ठरणारे गाजर गवत हद्दपार करण्यासाठी कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषीदुत यांनी माले्गाव येथे राबविली गाजर गवताच्या हद्दपारिसाठी मोहीम.गाजर गवत हे बारमाही तण असून, दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव वाढत आहे.याचे शास्त्रीय नाव पर्थेनियम हिस्टिरोफोरस (parthenium hystiophorus) असे आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या भागात गाजर गवताला काँग्रेस गवत, पांढरफुली,चटकचांदणी अश्या नावांनी ओळखले जाते. रस्त्याचा कडेला, तळ्या शेजारी, नदीनाल्याकाठी, पडीक जमिनीवर तसेच विविध पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवताचा प्रादुर्भाव दिसून येतो.गाजर गवताचा मानवी आरोग्यासह पिक उत्पादनावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. गाजर गवताच्या जैविक नियंत्रणासाठी ‘मेक्सिकन भुंगे ‘ म्हणजेच झायगोगग्रामा बायकोलरेटा हे कीटक अत्यंत फायदेशीर असल्याचे दिसून आलेले आहे.या मित्र कीटकाच्या मदतीने गाजर गवतावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. कृषी महाविद्यालय उमरखेड येथील विद्यार्थी श्रेयस मनोहर चौधरी, अनुप खुशाल चरडे, प्रविन विलास गहाणे, अतुल लडके, सुमित ढोकने या विद्यार्थ्यांनी मेक्सिकन भुंग्याचे महत्त्व सांगून त्यांचा वापर कसा करावा याबद्दल गावकऱ्यांना मार्गदर्शन केले,त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मेक्सिकन भुंगे गाजर गवतावर सोडून गाजर गवत निर्मूलनाच्या दिशेने एक पाऊल टाकले.या मोहीमे करीता कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विषतज्ञ श्री. एस. के. चिंतले सर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख वाय. एस. वाकोडे सर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.