Uncategorized

महागाव तालुक्यात धान्य वाटपात अनियमितता; करंजीतील लाभार्थी तीन महिन्यांपासून वंचित


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (राशन) धान्य वाटप करताना गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप पुढे आला आहे. दुकानांच्या ‘जोडी’ पद्धतीमुळे कुपनधारकांना पूर्ण धान्य मिळत नसून, तीन महिन्यांचे धान्य दाखवून प्रत्यक्षात केवळ दोन महिन्यांचेच वाटप केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
करंजी येथील अनेक लाभार्थींना मागील तीन महिन्यांपासून धान्य मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे चित्र आहे. यापूर्वीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान्य घोटाळा उघडकीस आला होता. आता त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दुकानांच्या जोडाजोडीच्या व्यवस्थेतून मोठ्या प्रमाणावर धान्याचा अपहार होत असून, काही ठिकाणी हे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचीही चर्चा आहे. परिणामी, खऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
याबाबत पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना, “करंजी परिसरात तीन महिन्यांपासून धान्य मिळालेले नाही. प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button