दहावीत ९६ टक्के गुण; त्रिषा लाखावात हिचे उज्ज्वल यश

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
एलआयटी विद्यापीठाचे प्राचार्य प्रा. गजानन प्रतापराव लाखावात यांची कन्या त्रिषा लाखावात हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शैक्षणिक वर्तुळात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सेंट जोसेफ हायस्कूल, नागपूर येथील विद्यार्थिनी असलेल्या त्रिषाने इंग्रजी, हिंदी, गणित, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि एआय सारख्या विषयांत उत्कृष्ट कामगिरी केली. या यशामागे तिची मेहनत, चिकाटी तसेच पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
त्रिषाला भविष्यात अस्ट्रोनॉटिकल इंजिनियर बनण्याची इच्छा असून, त्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील आहे. तिच्या या ध्येयाने अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
या यशाबद्दल प्रा. गजानन लाखावात व त्यांच्या पत्नींचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच मंजिरी मॅडम आणि गोपाल माधवानी सर यांचे मार्गदर्शनही या यशात मोलाचे ठरल्याचे सांगितले जात आहे.
त्रिषाच्या या यशामुळे कुटुंबीयांसह शाळा व परिसरात आनंदाचे वातावरण असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



