Uncategorized

महागावात एकाच नंबरवर धावणारी दोन प्रवासी वाहने उघड – पाच लाखांचे वाहन जप्त


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : एकाच नोंदणी क्रमांकाचा वापर करून दोन वेगवेगळ्या प्रवासी वाहनांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार महागाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एकावर गुन्हा दाखल केला असून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात एकाच नंबरची दोन वाहने प्रवासी वाहतुकीसाठी धावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तपास केला असता हा प्रकार उघड झाला. एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात दोन्ही वाहनांवर एकाच क्रमांकाची नोंद एम एच23/ऐ8446 आढळून आली. कागदपत्रांची पडताळणी केली असता एक वाहनाची कागदपत्रे योग्य आढळली, तर दुसऱ्या वाहनाबाबत मालकाने स्पष्ट माहिती देऊ शकली नाही. त्यामुळे वाहन चोरीचे किंवा बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. असे किती वाहन परिसरामध्ये आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे महागाव तालुक्यातील बरेच वाहन चोरीला गेले आहेत बोलेरो पिकप या गाड्या. चोरी गेले आहेत याचासुद्धा शोध लावणे गरजेचे आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधिक तपास करून या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button