बेलदरीच्या यामिनी आडेचा राज्यात द्वितीय क्रमांक; ९९.२०% गुणांनी महागावचा मान उंचावला

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव : महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बेलदरी येथील कृषी सहाय्यक नंदकिशोर आडे यांची कन्या कुमारी यामिनी आडे हिने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत ९९.२० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे महागाव तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले आहे.
सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत यामिनीने मोठा टप्पा गाठला असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातून पुढे येत तिने सिद्ध केलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यामिनीच्या यशामुळे आडे परिवाराचा नावलौकिक वाढला असून रमेश आडे, नंदकिशोर आडे व संपूर्ण कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच बेलदरी गावाचे नावही राज्यभर गाजले आहे.
यामिनीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महागाव तालुक्यातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.



