शहर

वाशी पुलाचे काम की भ्रष्टाचाराचे डबके? १ कोटींचा निधी हडप; कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराने जनतेचा जीव धोक्यात!

​
​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी – शेख खय्युम ):
चिंचोर्डी परिसरातील वाशी पुलाच्या कामात कंत्राटदाराने भ्रष्टाचाराची सीमा ओलांडली असून, चक्क ‘मातीमिश्रित’ काँक्रीटचा वापर करून शासनाची फसवणूक केली आहे. १ कोटींहून अधिकचा निधी असतानाही पुलाला आतापासूनच भल्यामोठ्या भेगा पडल्याने हे काम म्हणजे जनतेच्या पैशांची उघड लुटालूट ठरत आहे. कंत्राटदाराने स्वतःच्या फायद्यासाठी निकृष्ट साहित्याचा खच टाकला असून, हा पूल जनतेसाठी ‘मृत्यूचा सापळा’ बनत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
​या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाचे अभियंता जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून, कंत्राटदारावर कुणाचे वरदहस्त आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भ्रष्टाचार इतका टोकाचा आहे की, साध्या हाताने देखील काँक्रीट उखडत असून हा महाघोटाळा लपवण्यासाठी कंत्राटदाराने अनेक क्लृप्त्या लढवल्या आहेत. या कामाची तातडीने चौकशी करून कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात तालुक्यात प्रचंड जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button