शहर

७ वर्षीय अनशराची रूहानी भरारी; कडक उन्हात रोजे पूर्ण करून जपला सामाजिक सलोखा!


​हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम ):
भक्तीसाठी वयाचे बंधन नसते, हेच नई आबादी येथील चिमुकल्या अनशरा शेख जबी (वय ७ वर्षे) हिने सिद्ध केले आहे. या भीषण उन्हाळ्यात पाचवेळची नमाज आणि पवित्र रमजानचे सर्व रोजे अत्यंत जिद्दीने पूर्ण करून तिने एक नवा इतिहास रचला आहे.
​शहरासाठी मागितली एकात्मतेची दुआ:
हिजाब आणि फुलांच्या दागिन्यांनी सजलेल्या या चिमुकलीने जेव्हा अल्लाहकडे हात पसरले, तेव्हा तिच्या ओठांवर केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण हिमायतनगरच्या हिंदू-मुस्लिम एकता, शांतता आणि भाईचाऱ्यासाठी प्रार्थना होती. तिची ही निरागस दुआ आजच्या काळात सामाजिक सलोख्याचे सर्वात मोठे उदाहरण ठरली आहे.
​कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव:
दिवसभर अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही न घेता, या कोवळ्या वयात अनशराने केलेली ही कठोर तपश्चर्या पाहून संपूर्ण तालुका थक्क झाला आहे. तिच्या या ईमानी जज्ब्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ही चिमुकली शहरासाठी खऱ्या अर्थाने ‘शांतीचा दूत’ ठरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button