शहर

अखेर बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे कार्यकारी संचालक एम. आय. पात्री यांचा राजीनामा नामंजूर


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात पिंपळगाव येथील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक श्री. एम. आय. पात्री यांनी ग्रॅज्युटी रकमेच्या असल–नसल प्रकरणी आपला राजीनामा सादर केला होता. सदर प्रकरणाबाबत बातम्या प्रकाशित झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांनी तातडीने हा निर्णय घेतल्याचे समजते.
अखेर दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या सूतगिरणीच्या कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष श्याम पाटील व सर्व संचालकांनी श्री. पात्री यांचा राजीनामा एकमताने नामंजूर केला.
या बैठकीत सूतगिरणी सुरू राहावी, परिसरातील कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच संस्थेचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सूतगिरणीच्या आर्थिक बळकटीसाठी विविध जोडधंदे सुरू करून संस्थेला पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच कोणताही अनावश्यक खर्च न करता सूतगिरणीच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, संस्थेची प्रगती व टिकाव यासाठी संचालकांनी सामूहिक जबाबदारी घ्यावी, असा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button