Uncategorized

नॅचरल शुगर कारखान्याच्या वेस्टेज पाण्यामुळे जनावरांच्या जीवितास धोका;शेतकऱ्यांचा इशारा


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
सवना, गुंज परिसरातील नॅचरल शुगर कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या वेस्टेज (सांडपाणी) पाण्यामुळे जनावरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. कारखान्याने कोणतीही योग्य प्रक्रिया न करता जहरी वेस्टेज पाणी उघड्या परिसरात सोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे वेस्टेज पाणी अत्यंत विषारी असून ते पाणी जर जनावरांनी प्यायल्यास जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. आधीच शेती व जनावरांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर या प्रकारामुळे मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे.


कारखान्याच्या ढिसाळ नियोजनामुळे व निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वेस्टेज पाण्याची योग्य विल्हेवाट न लावता ते थेट परिसरात सोडणे हे पर्यावरण नियमांचे उल्लंघन असल्याचेही शेतकरी सांगत आहेत.
नॅचरल शुगर कारखान्याने तात्काळ या वेस्टेज पाण्याची दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी ठाम मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच या वेस्टेज पाण्यामुळे जनावरे किंवा माणसांच्या आरोग्याला कोणताही घातपात झाल्यास त्यास संपूर्णपणे कारखाना प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button