शहर

महागाव तालुक्यात पंचशिव वाघामाय देवस्थानाची तीन दिवसीय जत्रा उत्साहात


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील डोंगरगाव, बोथा, गौळ, आसोली व बाळूवाडी येथील नागरिकांनी पंचशिव वाघामाय देवस्थान येथे मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचशिव वाघामाय देवस्थान येथे तीन दिवसीय जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेनिमित्त परिसरातील तसेच बाहेरगावी गेलेले भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते.
जत्रेदरम्यान देवदर्शनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गाव सोडून कर्मचारी व इतर कारणांसाठी बाहेरगावी गेलेले अनेक नागरिक यावेळी खास गावात परतून देवदर्शन घेत असल्याचे चित्र दिसून आले. नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
डोंगरगावचे मूळ रहिवासी ॲड. नेमाडे साहेब हे नागपूर येथून आपल्या सहकुटुंबासह देवदर्शनासाठी उपस्थित होते. तसेच विविध शासकीय व खासगी सेवेत कार्यरत कर्मचारी वर्गानेही पंचशिव वाघामाय देवस्थान येथे हजेरी लावून दर्शन घेतले.
पंचशिव वाघामाय देवस्थानातील सर्व कार्यक्रमांचे नियोजन ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आले. सखारामजी नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचशिव वाघाबाई देवस्थान येथे पूजाविधी व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button