महागाव परिसरात बोगस बंगाली डॉक्टरचा सुळसुळाट आरोग्य विभागाचे कर्मचारी करतात वसुली(अन्न वऔषध प्रशासन अधिकारी झोपेत)

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यामध्ये मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण काळी दौलत खान ,फुलसांवगी, मुडाना, हिवरा, मोरथ या सर्व परिसरामध्ये बोगस डॉक्टर सुळसुळाट झाला आहे .तालुक्यामध्ये छोटे-मोठे 100 गावांचा समावेश आहे. त्या परिसरात कोणतेही डॉक्टरची पदवी नसताना बोगस डॉक्टर उपचार करताना दिसून येत आहेत. एका झोला डॉक्टरने काळी दौलत खान मुख्य चौकात दवाखाना उभारून खुलेआम रुग्णावर उपचार सुरू केला आहे. तर मुडाना येथे दवाखाना सुरू आहे. महागाव मध्ये बंगाली डॉक्टर मुळव्याध चे ऑपरेशन करत आहे. अशा बोगस डॉक्टरांमुळे वाघात येथील रुग्णाला आपला हात गमवावा लागला तर काही रुग्णांना विविध रोग जडले असे बोलले जात आहेत .महागाव तालुका आरोग्य अधिकारी त्यांचे कर्मचारी या बोगस डॉक्टर कडून मोठी वसुली करतात असे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही हे नवल आहे. खेडोपाडी असे बोगस डॉक्टर महागाव तालुक्यामध्ये खुलेआम प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडे गोळ्याचा साठा , सलाई मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो त्यांना ह्या गोळ्या व सलाईन कोण देतात याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे. एवढ्या मोठी गंभीर बाब असताना अन्न व औषध प्रशासन अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाही हे मोठी शोकांतिका आहे .एमबीबीएस डॉक्टर शिवाय काही गोळी देता येत नाही अशा गोळ्या सुद्धा बंगाली व बोगस डिग्री नसणाऱ्या डॉक्टरकडे उपलब्ध आहे .मनुष्य च्या जीवाशी खेळणारी कृती महागाव तालुक्यात सुरू असून आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या आशीर्वादाने बोगस डॉक्टर डिग्री नसणाऱ्या डॉक्टरची प्रॅक्टिस सुरू असल्याचे दिसत आहे. आरोग्य अधिकारी यांचे कर्मचारी अशा बोगस डॉक्टर वाल्याकडून खुलेआम वसुली करतात त्यांना लगाम कोण लावेल ?अशा कर्मचाऱ्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून निलंबित करावे व डिग्री नसणारे बोगस बंगाली डॉक्टर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी त्यांना इंजेक्शन देण्याचा अधिकार नसताना सुद्धा ते पेशंटला सून पाडूनऑपरेशन करतात ही मोठी शोकांतिका महागाव तालुक्यात नागरिकांच्या जीवाशी खेळत असलेले चित्र दिसून येत आहे. त्यामुळे महागाव तालुक्यात पेशंटचा अचूक उपचार न होता त्यांचे रूपांतर मोठ्या आजारामध्ये होत आहे. त्याला जबाबदार कोण? जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अशा बोगस डॉक्टर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहे. असे न झाल्यास परिसरामध्ये मोठे आजार झालेले पेशंट पाहायला मिळतील.



