Uncategorized

राहुर येथील अपात्र सरपंच्याला राजकीय दबाव तंत्रातून बीडीओंनी प्रभार दिल्याचा उपोषणकर्त्याचा आरोप…प्रशासना विरोधात प्रभारी सरपंचाचे, गावकऱ्यांसह आमरण उपोषण सुरू!

महागाव, प्रतिनिधी संजय नागरगोजे

राहुर येथील भ्रष्ट सरपंचाला आर्थिक व्यवहार करून रात्री बारा वाजताचे दरम्यान 6 ऑक्टोबर 2025 रोजी गटविकास अधिकारी महागाव यांनी नियमबाह्य आदेश देऊन अपात्र सरपंच्याला ग्रामपंचायतचा आर्थिक प्रभार देण्यासाठी सुचित केले, हे गावकऱ्यावर अन्याय आहे. गट विकास अधिकाऱ्यां द्वारे वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना झाल्याने शिवाजी रामचंद्र गोपणवाड आणि दामोदर चाफाजी जाधव यांनी 11 ऑक्टोबर पासून महागाव पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात अनेक ग्रामस्थासह आमरण उपोषणाला सुरुवात केली.
या बाबत सविस्तर वृत्त, राहुर गावच्या सरपंच्या राजनंदनी शिवाजी काचेवार यांनी राहुर ग्रामपंचायतीच्या अनेक कारभारामध्ये अनियमितता व पदाचा दुरुपयोग केल्याचे पंचायत समितीच्या अहवालावरून जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 4 आगस्ट रोजी त्यांना अपात्र घोषित केले. सेवादास महाराज मंदिरातील साफसफाई, सार्वजनिक विहिरीच्या साफसफाई मजुरीच्या धनादेशावर सचिवांनी स्वाक्षरी केली असतांना सरपंच यांनी स्वाक्षरी केली नव्हती. सरपंच्या यांचे पतीने सरपंचाच्या शिफारशीवरून पक्के घर असतांनाही कच्चे घर दाखवून पदाचा दुरुपयोग करून घरकुलाचा लाभ घेतल्याचा जिल्हाधिकारी यांनी ठपका ठेवला आहे. अग्रीम म्हणून घरकुलाचे 15 हजार रुपये उचल केलेली रक्कम वसुली पात्र घोषित केले होते, तरीही अद्याप महागाव गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी ती रक्कम वसूल न करता संबंधीचा वर फौजदारी कार्यवाही करणे अपेक्षित असतांना राजकीय दबावामुळे आयुक्तांच्या आदेशाचा गैरअर्थ काढून आर्थिक घेवान करून अपात्र सरपंचाला पदभार देण्याचे पत्र दिले आहे. वास्तविक पाहता सरपंच्यावर वरील अनियमित्ता व ग्राम विकास अधिकारी यांच्या अहवालावरून सर्व आरोप सिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 4 ऑगस्ट रोजी अपात्रतेचा आदेश पारित केला. या आदेशाच्या विरोधात अपात्र सरपंच्यानी आयुक्ताकडे अपील केले होते. या अपीलावर 4 ऑगस्ट 2025 रोजी आदेशाला स्थगिती मिळावी असा अर्ज केला असता आयुक्तांनी सर्व घटनाक्रम व दोन्ही बाजू एकूण 13 ऑगस्ट 2025 रोजी अपात्र सरपंच्याला स्थगीती न देता जिल्हाधिकारी यांचा आदेश ‘जैसे थे’ ठेवला आहे. परंतु दुसऱ्या तारखेवर 3 सप्टेंबर 2025 रोजी अपात्र सरपंच्याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला अंतिम स्थगिती दिली होती. परंतु पुढील तारखेला 24 सप्टेंबर 2025 रोजी ही अंतिम स्थगिती उठवून पूर्ववत 13 ऑगस्ट 2025 रोजीचे ‘जैसेथे’ चे आदेश कायम ठेवले आहे, एवढे सुस्पष्ट आदेश असतांनाही महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रेय कदम यांनी शेवटचे 24 सप्टेंबर 2025 चे आदेश विचारात न घेता मुद्दाम राजकीय दबावात 3 सप्टेंबर 2025 चे रद्द झालेल्या अंतरिम आदेशाचा आधार घेऊन भ्रष्ट सरपंच्याला आर्थिक व्यवहार करून रात्री बारा वाजताच्या दरम्यान 6 ऑक्टोबर 2025 रोजी नियमबाह्य पद्धतीने आदेश देऊन अपात्र सरपंच्याला राहुर ग्रामपंचायतचा आर्थिक प्रभार देण्यासाठी ग्राम विकास सचिवाला सुचित केल्याने गावकऱ्यावर तर अन्याय झालाच, गटविकास गटविकास अधिकारी दत्तात्रेय कदम यांनी 6 ऑक्टोबर रोजी ग्राम विकास अधिकारी राहुर यांना दिलेले आदेश तात्काळ रद्द करून 4 ऑगस्ट 2025 रोजीचे ‘जैसे थे’ ठेवावे या मागणीसाठी प्रभारी सरपंच शिवाजी गोपनवाड, माजी सरपंच दामोदर जाधव, दिलीप जाधव, टिपू शेख यांनी उपोषणाची सुरुवात केली.

(बॉक्स)

उपोषणकर्त्याच्या मागण्या;

# गटविकास अधिकारी महागाव यांचे 6ऑक्टोबर 2025 चे पत्र रद्द करा आणि उपसरपंचाकडे प्रभार कायम करा… !

# आयुक्त अमरावती यांचे 13 ऑगस्ट रोजीचे आदेशानुसार 24 सप्टेंबर 2025 नुसार जिल्हाधिकारी यांचे 4 ऑगस्ट 2025 च्या आदेशाची अंमलबजावणी करा…!

# भ्रष्टाचारी सरपंच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि अपात्र सरपंच्या कडून वसूल पात्र रक्कम पंधरा हजार रुपये आजच वसुली करा…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button