सामाजिक

आजच्या युगातील खऱ्या दुर्गाचा उमरखेड जिजाऊ ब्रिगेडतर्फे सन्मान

शेख मुजाहिद सह-संस्थापक

नवरात्री मध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्यांचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, जिजाऊ ब्रिगेड दरवर्षी समाजातील ज्या वंचित घटक समजल्या जाणाऱ्या महिला असतात, त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करते. या वर्षीही, नैसर्गिक आपत्तीमुळे संसार उध्वस्त झाला तरीही खंबीरपणे उभ्या राहून कुटुंबाची जबाबदारी पार पाडणाऱ्या खऱ्या “दुर्गा” महिलांचा सन्मान करण्यात आला. उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरातील अशा संकटातून उभ्या राहिलेल्या महिलांना साडी-चोळी आणि खाऊ देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडतर्फे दिवाळीतही या कुटुंबांना मदतीचा हात देण्याची ग्वाही दिली गेली. तसेच प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आणि लढण्यासाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत राहू, असा विश्वास महिलांना सरोज देशमुख यांनी दिला. या प्रसंगी प्रदेश जिजाऊ ब्रिगेड सहसचिव, सरोज देशमुख, उमरखेड तालुकाध्यक्ष शोभा राऊत, रजनीताई मुडे, सत्वशीला चंद्रवंशी, अश्विनी भोकरे, सुरेखा पवार सह गावातील असंख्य महिला व जिजाऊ रणरागिनी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button