शहर

चातारी येथील अतिवृष्टी दरम्यान बाधित कुटुंबांना धान्य पुरवठा कधी होणार?

अतिवृष्टी बाधित कुटुंबीयांची आर्त हाक कुणी ऐकेल का हो…..
शेख मुजाहिद सह-संस्थापक
उमरखेड: राज्यभरात सर्वत्र अतिवृष्टी होत असून त्यामध्ये नेहमी कसोट्यात सापडणारा शेतकरीवर्ग अत्यंत अडचणीत आला असून दिनांक १७,१८,१९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये चातारी येथील असंख्य घरात पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली, कित्येक कुटुंब उघड्यावर आले.
अतिवृष्टी दरम्यान चातारी येथील बाधित झालेल्या कुटुंबांचा त्वरित सर्वे करून त्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मार्फत तात्काळ अन्नधान्य पुरविण्यात यावे या दृष्टीने ग्रामसेवकांनी पुरवठा विभागास सादर केलेल्या ४२५ बाधित कुटुंबा करिता माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी ४२.५ क्विंटल गहू, ४२.५ क्विंटल तांदूळ तातडीने मंजूर करून दिल्याने उमरखेड येथील कर्तव्यदक्ष पुरवठा निरीक्षक अमोल महाजन यांनी लगेच उपरोक्त धान्य चातारी येथील रास्त भाव दुकानदार कन्नावार यांना पोहोचविला अशी माहिती भ्रमणध्वनी द्वारे प्रतिनिधीशी बोलताना पुरवठा निरीक्षक यांनी दिली तसेच बाधित कुटुंबीयांना धान्य वितरित केल्याची पोच पावती म्हणून त्यांची नावे लिहून सही अथवा अंगठा घेऊन ती यादी सादर करण्याबाबत सुचित केल्याचे सांगितले. परंतु अद्याप पर्यंत त्या बाधित कुटुंबीयांना धान्य पुरवठा का करण्यात आला नाही नैसर्गिक आपत्ती दरम्यान सदर रास्त भाव दुकानदाराने धान्य वितरण करणे किती गरजेचे होते याची कल्पना नसावी का?त्यामुळे त्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सदर कुटुंबीयांना शासनातर्फे पुरविण्यात आलेले धान्य काळ्या बाजारात विकण्याचा मानस तर सदर दुकानदाराचा नव्हता ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तरी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करून त्या गोरगरीब बाधित कुटुंबीयांना त्वरित धान्य वितरित करण्याची तसेच सदर रास्त भाव दुकानदारावर निलंबन प्रक्रिया करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button