शहर

महागाव तालुक्यात वरुडी येथील मेन लाईन पोल पडलेले उभे केव्हा होणार ! त्यामुळे शेतकरी हैरान(शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही ,याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी )

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीने पैनगंगा तीरावरील वरुडी, कासारबेळ ,सेवानगर,थार ,अनंतवाडी, येथील शेतकरी अतिवृष्टीने व पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हैरान झाले आहे .पावसाळी पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी ऊस लावाच्या मनस्थितीत असताना परिसरामधील मेन लाईन पोल पडल्यामुळे लाईन बंद असल्यामुळे ते आजपर्यंत उभे न झाल्यामुळे व त्यावरील विद्युत प्रवाह सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी व्यथा कोणाला सांगावे अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे ऊस लागवड करण्यासाठी प्रयत्न असफल झाल्यामुळे शेतकरी चिंतेत व निराश अवस्थेतअसताना त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे .लाईनमन साबळे हे शेतकऱ्याचे हित जोपासत नसून अधिकारी कोणतेही शेतकऱ्यांना सहानुभूती देत नसल्यामुळे महागाव तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे . याला जबाबदार कोण?त्यामुळे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी शेतकऱ्यांचे हित जोपासण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यांनी फक्त प्रसिद्धी पुरते फोटो सेशन करून स्वतःची प्रसिद्धी वृत्तपत्रातून करू घेतल्याचे दिसून येत आहे .प्रत्यक्षात शेतकरी जगावे की मरावे अशा परिस्थितीत आहे. त्यांच्या शेतात आजपर्यंत लाईन सुरू करण्यासाठी पडलेले साधेपोल उभे करण्यात आले नाही .त्यामुळे शेतातील मोटर पंप बंद अवस्थेत पडले आहे. लाईन जोडण्यात आली नाही याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने साधी शेतकऱ्यांना विचारपूस सुद्धा केली नाही .त्यामुळे परिसरातील शेतकरी अधिकाऱ्यामुळे निराश अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिसरामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या करणे थांबत नाही याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी असल्याचे दिसून येत आहे. तात्काळ प्रश्न निकाली न निघाल्यास शेतकरी आत्महत्या करतील तेव्हा याला जबाबदार कोणाला धरावे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button