राज्य महामार्गावर361वर मुडाणा येथे….

दीक्षाभूमी नागपूरला जाणाऱ्या बौद्ध अनुयायांना भोजनदान!
महागांव, प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मुडाणा येथील समाज बांधवांकडून ‘पवित्र दीक्षाभूमी नागपूर’ येथे होऊ घातलेल्या विजया दशमी सोहळ्यासाठी जाणाऱ्या धम्म बांधवांसाठी भोजनदान व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य महामार्ग नागपूर- तुळजापूर 361 वर मुडाणा गावालगत युनियन बँक समोरील बस थांबा पॉईंटवर 1 ऑक्टोबर रोजी या मार्गावरून अख्या महाराष्ट्रातील बौद्ध बांधव नागपूर दीक्षाभूमी कडे मार्गक्रम करणार आहेत. या ठिकाणाहून जाणाऱ्या बांधवांसाठी भोजनदान, नाश्ता, चहा पाण्याची पेंडालची उभारणी करुन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम राबविल्या जात आहे.
महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार शिल्पकार, बोधिसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी या पवित्र दिनी नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. या पवित्र दीक्षाभूमीला नतमस्तक होऊन अभिवादन करण्यासाठी जगभरातील बौद्ध अनुयायी या ठिकाणी एकत्रित येत असतात. या राज्य महामार्गावरून येणाऱ्या सर्व बौद्ध बांधवांना विनंती की, या मार्गावर महागाव शहरा लगत चार किलोमीटर अंतरावरील मुडाणा येथील बस थांब्यावर मुडाणा येथील समाज बांधवांच्या वतीने जाणाऱ्या प्रवासी बांधवांसाठी भोजनदान व्यवस्था ठेवली आहे. पंचशील त्रिशरण ग्रहण करून भोजनदान व्यवस्थेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त या मार्गावरून मार्गक्रम करणाऱ्या बौद्ध अनुयायांनी भोजनदानाचा लाभ घ्यावा अशी येथील समाज बांधवा मार्फत परमेश्वर बरडे, धम्म उपासक यांनी नम्र आव्हान केले आहे.



