काळी दौलत येथे रेती वाहतुकीवर आरसीपी व वनविभागाची धडक कारवाई8 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यामध्ये काळी दौ. अवैध रेती वाहतूक करणारे माफिया यांच्यावर आरसीपी व वन विभागाची संयुक्त धडक कारवाई करून आठ लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . त्या कारवाई मध्ये ट्रॅक्टर क्रमांक 29 बी पी 69 17 आरोपी आकाश उत्तम बडगे यांचे ट्रॅक्टर जप्त करून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली. तसेच 29 -9 -2025 रोजी या झालेल्या कारवाईमध्ये सकाळी चिचपाड येथे जंगलामध्ये लाल रंगाचे ट्रॅक्टर बिगर नंबर प्लेट चे रेती वाहतूक करताना पकडण्यात आले ट्रॅक्टर जप्त करून तीन लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मारुती तुकाराम बडगे व इतर चार आरोपी पळून जा ण्यात यशस्वी झाले. सर्व परिसरामध्ये नंबर प्लेट नसलेले ट्रॅक्टर व ट्रॉली वाहतूक करीत आहे .त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई करण्यात
आली त्यामुळे परिसरामध्ये अवैध रेती वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहे .महसूल प्रशासन तहसीलदार अभय मस्के हे कारवाई करण्यास असमर्थ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले आज नव्याने रुजू झालेले रोहित शिंदे परिविक्षाधीन तहसीलदार यांनी दोन ट्रॅक्टर पकडून मोठी कारवाई केली आहे .दंडाची कारवाई सुरू आहे. त्यामुळे परिसरामध्ये संपूर्ण वनविभाग कारवाई करण्याच्या तयारीत दिसत आहे.



