Uncategorized

भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर कार्यकारणी चर्चात्मक बैठक आज संपन्न.


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

आज उमरखेड येथे नवनियुक्त भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी मोर्चा व आघाडी अध्यक्ष सर्व सेलचे संयोजक यांची शहर कार्यकारिणी घोषित झाल्यानंतरची प्रथम चर्चात्मक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनात्मक विषयावर अतिशय सकारात्मक व विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.
विशेष रूपाने आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणूक संदर्भात सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा पुसद व यवतमाळ जिल्हा समन्वयक श्री नितीनभाऊ भुतडा आमदार श्री किसनराव वानखेडे माजी आमदार श्री नामदेवराव ससाने माजी आमदार श्री विजयराव खडसे व जिल्हा सरचिटणीस भाजपा श्री महेश जी काळेश्वरकर व नवनियुक्त उमरखेड शहर कार्यकारणी पदधिकारी उपस्थित होते. त्यांना मार्गदर्शन करून पक्ष संघटित करण्याचे तसेच होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष बांधण्याचे नियोजन करून संघटित करण्याचे आश्वासन नितीन भाऊ भुतडा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button