Uncategorized

पोफळी येथील शिवाजी विद्यालय तील विद्यार्थ्यांनी घडविल्या पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मुर्त्या

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय पोफाळी येथील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी इको क्लबच्या माध्यमातून अनिल नगरधने यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण पूरक गणपती मुर्त्या व पोळ्यानिमित्त बैलाच्या मुर्त्या शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी तयार करून एक आगळावेगळा गुण विशेष दाखवण्याचा प्रयत्न केला या प्रकल्पामुळे लहान मुलांना योग्य संस्कार देऊन त्यांच्या मेंदूवर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून व्यावसायिक शिक्षण देण्याचे कार्य विद्यालयाकडून करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींनी सुरेख गणपती च्या मुर्त्या व आकर्षक बैलाच्या मुर्त्या तयार केल्यामुळे त्यांचा गुणगौरव विद्यालयाच्या वतीने रवी शिलार, प्राचार्य अवधूत देवसरकर, सुरेश सुरोशे, अनिल नगरधने, माणिक कांबळे, आनंद माने यांनी केला
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचे संस्कार बाल मनावर पडावे व त्यांनी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करावे या उद्दात्त हेतूने शिवाजी विद्यालय पोफळी येथे हा उपक्रम घेण्यात आला
यावेळी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button