Uncategorized

खासदार संजय देशमुख यांची उपोषण मंडपाला भेटपु

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

दि . २३ ऑगस्ट रोजी पुसद येथील तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांच्या पदभरतीसाठीच्या साखळी उपोषणास भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.

या उपोषणात विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार झालेली न झालेली भरती, शासकीय व निमशासकीय पदभरतीतील प्रमाणपत्र सत्यापन शिबिरे, शासन निर्णय २०१९ नुसार प्रलंबित प्रकरणांना सशर्त वैधता देणे, अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त असलेली मोठ्या प्रमाणावरील पदभरती, सार्वजनिक आरोग्यविभागातील

१४४८ रिक्त पदे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील ३०९ कारकून वर्गाच्या हक्काची पदे अशा विविध मागण्या मांडल्या.

या सर्व मागण्यांबाबत शासना सोबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन संजय उत्तमराव देशमुख
खासदार, यवतमाळ-वाशिम यांनी उपोषणकर्त्यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button