उमरखेड येथे चक्काजाम आंदोलन राज्यमार्ग 2 तास वाहतूक ठप्प

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड शहरातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तसेच राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी, दिव्यांग, कष्टकरी, सर्व पक्ष सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षांचा कार्यकर्त्यांनी ठिया देत दोन तास वाहतूक ठप्प करत सरकारने तात्काळ कर्जमाफीसाठी ठोस भूमिका घेऊन कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी व अन्य इतरही 17 मागण्यांवर तात्काळ शासनाने तोडगा काढावा अशी मागणी लावून धरली. यावेळी आंदोलक हे आक्रमक होत असल्याने पोलीस प्रशासनाने आंदोलकांना स्थानबद्ध केले. या रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ बांधव मच्छीमार बांधव यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व संघटनेचा कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले होते. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला उमरखेड तालुक्यातील चुरमुरा, दिघडी या ग्रामपंचायतींनी ठराव घेत सदर चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
चौकट
ग्रामपंचायतीने ठराव घेत आंदोलनाला दिला पाठिंबा !
चातारी गावातील व्यापारी बंधू सह ग्रामस्थांनी पुकारला बंद !
उमरखेड तालुक्यातील तसेच मत खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणारी चातारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी व व्यापारी बंधूंनी स्वयंसमूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.



