Uncategorized

काही ग्रामसेवकावर तीन-चार ग्रामपंचायतीचा भार ! तर काहींकडे एकच ग्रामपंचायत

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड: स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाची संस्था म्हणून ग्रामपंचायतीची ओळख आहे. शासन आणि गावकर्‍यांमधील ग्रामसेवक हा महत्त्वाचा दुवा आहे. परंतु उमरखेड तालुक्यातील चित्र पाहिल्यास एकाच ग्रामसेवकाकडे 3, 4 ग्रामपंचातीचा प्रभार देण्यात आलेला आहे. तर काही ग्रामसेवकाकडे फक्त एकच ग्रामपंचायत आहे. काही मोजक्याच ग्रामसेवकांना जास्त ग्रामपंचायती आणि इतरांना फक्त एकच असा प्रभार देण्याचे नेमके कारण आर्थिक हितसंबंधांमुळे ? की वरिष्ठ अधिकाऱ्यांची जवळीकता ? हे मात्र गुलदस्त्यात आहे. ग्रामपंचायत अधिकारी यांची संख्या भरपूर असताना ग्रामसेवकाकडे विडुळ चुरमुरा मुळावा, तर एकाकडे चातारी ब्राह्मणगाव, मेट अशा तीन तीन ग्रामपंचायतचा प्रभार आणि बाकीच्यांकडे एकच ग्रामपंचायत आहे याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. ज्या ग्रामसेवकांकडे तीन-तीन, चार – चार ग्रामपंचायती आहेत त्यांना इतर देखील काही कामे असल्याने ते ठरवून दिलेल्या दिवशी ग्रामपंचायतीला जात नाहीत त्यामुळे गावातील कामे वेळेवर होत नाहीत आणि विकासकामाला खीळ बसते. जास्त ग्रामपंचायत तिचा भार ग्रामसेवक यांच्यावर असल्याने आठ पंधरा दिवसाला एकदा ग्रामसेवक ग्रामपंचायतला भेट देतात आणि बारीक सारीक कामे करून निघून जातात त्यामुळे गावकऱ्यांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टीचा बारकाई अभ्यास करून जे ग्रामसेवक फक्त एकच ग्रामपंचायतचा कारभार पाहतात त्यांना देखील ग्रामपंचायत चा प्रभार दिल्यास इतर ग्रामसेवकावरील ताण कमी होईल आणि गावगाडा सुरळीत चालण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button