ढाणकी येथे सर्व पक्षीय व शेतकऱ्यांनी केला चक्का जाम

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
ढाणकी :- शेतकरी कर्जमाफीसह अन्य 17 मागण्यांसाठी जात पात धर्म, पक्ष, राजकीय विचार बाजूला ठेऊन कष्टकरी शेतकरी, शेतमजुर समाज यांनी चक्काजाम आंदोलनामध्ये संपूर्ण ताकतीसह चक्काजाम मध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान करताच शेकडो च्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून चक्काजाम आंदोलन करत अर्धा घंटा रोड वर गाड्या अडवून ठेवल्यामुळे अर्धा घंटा वाहतूक कोंडी झाली होती. यावर बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी आंदोलन करणाऱ्याना स्थानबद्द केले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी अटक होत असताना, “ना कुठल्या पक्षाचा झेंडा फक्त शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा व्हावा हाच एक अजेंडा”, “जय जवान जय किसान” चे नारे देत आंदोलन पूर्ण केले.



