खंडाळा घाटात दगडाखाली पुरुन ठेवलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या मृतदेहाच्या खुनाच्या गुन्हयाचा अवघ्या 04 तासात उलगडा अज्ञात 03 आरोपी निष्पन्न करुन अटक. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
दिनांक 08/07/2025 रोजी 16/00 वाजता पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत खंडाळा घाटात पोलीस स्टेशन खंडाळा मानव मिर्सीग रजि नं 22/2025 मधील मिसींग इसम नामे-शेख अयाज शेख हारुन वय 21 वर्ष, रा. खंडाळा ता. पुसद यांचा कोणीतरी अज्ञात इसमांने गळयावर धारदार शस्त्राने वार करुन त्यास जिवेठार मारुन पुरावा नष्ठ करण्याच्या इरादयाने खंडाळा घाटात जंगलात त्याचे प्रेतावर दगड गोटे टाकून लपवून ठेवले होते. अशा परिस्थितीत मिळून आल्याने त्यावरुन इसम नामे-शेख हारुन शेख हुसेन वय 50 वर्ष, रा. खंडाळा ता. पुसद जि. यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारी वरुन दिनांक 08/07/2025 रोजी पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे अप क्रमांक 432/2025 कलम 103, 3(5), 238 भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून व सदर गुन्हयातील अज्ञात मारेकरी शोधण्याचे पोलीसांपुढे असलेले कठीण अवाहन पाहता पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक श्री सतीष चवरे यांना गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद या पथकांस सदरच्या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथकांने तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला त्याप्रमाणे त्यांना गुप्त बातमीदारा कडून काही संशयीत लोकांची माहीती प्राप्त झाली असता त्यावर सदर पथकांने अभ्यास करुन पोलीस कौशल्याचा वापर करुन सदर गुन्हयातील आरोपी हे मयतांचे शेताच्या शेजारील व ओळखीचे असल्याचा अंदाज लावून त्याप्रमाणे संशयीत इसम नामे-1) शेख अल्ताफ शेख इरफान ऊर्फ अप्पू वय 35 वर्ष, 2) शेख वसिम शेख इरफान ऊर्फ अप्पू वय 24 वर्ष, 3) शेख अफताफ शेख अल्ताफ वय 19 वर्ष, सर्व रा. खंडाळा ता.पुसद जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता सदर आरोपी हे खंडाळा जंगलात लपून बसण्याच्या इरादयात असतांना त्याना अतिशय शिताफीने ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्यांच्याकडे विचारपूस करता यांतील मयत इसम व आरोपी यांच्यात पुर्वी भांडण झाले होते. व गेले दोन दिवसापुर्वी मयत हा त्याचे बक-या व बैल आरोपी यांचे शेताजवळ चारण्याकरीता घेवून आला असता त्या कारणावरुन आरोपी यांनी संगणमत करुन मयतांस मारहाण करुन कु-हाडीने त्याचे गळयावर वार करुन पुरावा नष्ठ करण्याच्या इरादयाने सदरचे प्रेत जंगलात दगड गोटे टाकून लपून ठेवले अशी कबूली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला. त्यांना पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी.जे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/मुन्ना आडे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



