Uncategorized

नागरिकाच्या प्रयत्नाने महागाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी रुजू


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू होऊन एक वर्ष झाले होते .परंतु एकच डॉक्टर व अपुरा स्टॉप असल्यामुळे पेशंटला उपचार घेण्यास प्रतीक्षा करावी लागत होती .त्याची दखल सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पाठपुरावा करून जिल्हाधिकारी यवतमाळ येथे निवेदन देऊन ही समस्या सोडविण्यात आली.त्यामुळे आज 9-7- 2025 रोजी डॉ.सत्यम गंगाधर राऊत यांची महागाव ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती झाली. सेवेचा त्यांचा आज पहिल्या दिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना उपचार घेण्यास संपूर्ण सहकार्य केले जाईल व योग्य मार्गदर्शन करून नागरिकांचे समाधान केले जाईल असे मत व्यक्त करून पेशंटच्या उपचाराला सुरुवात केली त्याप्रसंगी त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन महागाव नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, अतुलजी शिंदे, प्रतिश अडकिने, महादेव वाकोडे,विठ्ठल वाघमारे, गणेश साबळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button