दराटी पोलीस स्टेशन अंतर्गत कोरटा येथील तरुणाच्या खून प्रकरणात तिघांना अटक

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
कोर्टा येथे ५० रुपये उधारीच्या वादात तिघांनी तरुणाला मारहाण करून जमिनीवर आपटले यात गंभीर जखमी झालेला तरुणाचा मृत्यू झाला कोर्टा येथे शनिवारी घडलेल्या खून प्रकरणात दराटी पोलिसांनी कुणाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे दत्ता चिंतामण बरंगे वय 32 राहणार दराटी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून आरोपी श्रीराम लक्ष्मण उर्फ गोदाजी तोरकड वय 23 वर्षे माधव मारुती तोरकड लक्ष्मण उर्फ गोदाजी महादू तोरकड व 77 सर्व आरोपी अटक झाली असून तिन्ही आरोपी कोरटा या गावातील आहे दत्ता याचा मित्र असलेला माधव तोडकर यांच्यासोबत पन्नास रुपयाच्या देण्याघेण्यावरून वाद झाला यातून तिघांनी बेदम मारहाण करून जमिनीवर आपटले गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी किनवट वरून आदीलाबादला नेत असताना मृत्यू झाला .याप्रकरणी मृत तरुणाची बहीण कमल बंडू शिरडे यांनी दराटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून तिघाविरुद्ध कलम103(1) 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा नोंदवून अटक केली.