सात दिवसात लेखी स्वरूपाचे पुरावे सादर करावेत ; सहायक निबंधक

“सहाय्यक निबंधकांनी तक्रारकर्त्यांना पुरावे सादर करण्याच्या केल्या सूचना”
महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे
माजी सभापती दीपक आडे यांच्या काळात
कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव या संस्थेने शासनाच्या लेखा परीक्षकांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालावर कृषी उत्पन्न बाजार समिती महागावच्या संचालक मंडळाने चौकशी समिती नेमून अहवालीतील त्रुटी, गैरप्रकार आणि शासकीय रकमेचा अपहार याबाबत पंजाबराव खडकेकर आणि पंजाबराव गावंडे यांनी जिल्हा उपनिबंधाकडे तक्रारी केल्या होत्या. आता सहाय्यक निबंध सहकारी संस्था पुसद यांनी नुकतेच तक्रारकर्त्यांना सात दिवसात लेखी पुरावे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये काय रंग येतो याची सहकार क्षेत्रामध्ये उत्सुकता लागली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव या संस्थेने 2018-19, 2020-21 आणि 2021 या तीन वर्षांचे शासनाच्या लेखा परीक्षकांनी केलेल्या लेखापरीक्षण अहवालावर कृषी उत्पन्न बाजार समिती महागावच्या संचालक मंडळाने चौकशी समिती नेमून अहवालातील त्रुटी, गैरप्रकार, अनियमित्ताचा व शासकीय रकमेचा अपहार प्रचंड प्रमाणात झाला होता. या बाबत पंजाबराव काशिनाथ गावंडे व पंजाबराव रामराव देशमुख खडकेकर यांनी 8 एप्रिल 2025 रोजी जिल्हा उपनिबंधक यवतमाळ जिल्हा कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. आता बाजार समितीमध्ये झालेल्या अनियमीयत्तेचा भांडाफोड होणार आहे. त्या अनुषंगाने 20 मे रोजी एस.आर. भालेराव सहायक निबंधक पुसद यांनी एका पत्राद्वारे तक्रारकर्त्यांना येत्या सात दिवसात आपले लेखी स्वरूपात खुलासा आणि पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. चुकीच्या मार्गाने घेण्यात आलेली कर्मचारी पदभरती आणि मागील तीन वर्षातील गैरकारभार चव्हाट्यावर येणार आहे. त्यामुळे महागाव तालुक्यात बाजार समितीच्या प्रकारामध्ये नेमके काय घोळ झाला ? हे आता काहीच दिवसात उघड होणार आहे, याबाबत जनतेला मोठी उत्सुकता लागली आहे.