मलकापूर चिखली येथे विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळीवर गुन्हे नोंद!

सासरच्या आर्थिक त्रासाने विवाहितेने राहत्या घरीच घेतला गळफास!
महागाव प्रतिनिधी संजू नागरगोजे
प्रल्हाद गायछाप मानतुटे रा. काळी (दौ) यांच्या जबानी रिपोर्ट वरून सासरच्या मंडळी विरुद्ध सुनेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याने पोलीस स्टेशन महागांव येथे विविध कलमान्वये गुन्हे नोंद झाले.
आत्महत्याग्रस्त महिलेचे वडील प्रल्हाद मानतुटे यांनी आपल्या मुलीस सासरच्या मंडळीकडून वारंवार माहेरहून पैशाची मागणी साठी मुलींचा छळ करण्यात येत आल्याचे तक्रारीतून म्हटले आहे. मृतक कोमल ही पाच वर्षा आधी मलकापूर चिखली येथील युवक विनोद तुकाराम आढाव यांच्या प्रेमात पडली. विनोदने कोमलला सुखी संसाराच्या अनाभाका देत प्रेम संबंध वाढवले. दोघांनी एकमेकांना विश्वासात घेत चार-पाच दिवस पलायन केले. नंतर नातेवाईकांनी समोपचाराने दोघांना एकत्र करीत 20 एप्रिल 2020 रोजी समाजातील रीती रिवाजाप्रमाणे त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर विवाहित कोमल सासरी नांदण्यासाठी गेली. सुरुवातीचे वर्षभर तिला चांगली वागणूक मिळाली. नंतर पतीकडून खर्च साठी वारंवार माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावून तिचा सतत छळ होत गेला. विवाहीतेस प्रत्येक वेळी माहेरी आल्यावर परत सासरी जातांना दोन हजार, तीन रुपये वडिलांकडून आणण्याची मागणी होत असल्याने ती कमालीची वैतागून गेली. सासरे तुकाराम आढाव यांच्या सांगण्यावरून विवाहित महिलेस पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. पुढे पती विनोद याने आपणाला मोटरसायकलचे हप्ते भरावयाचे असल्याने माहेरून 35 हजार रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला, अन्यथा तर तुला घरामध्ये ठेवणार नाही असा दम दिल्याने मुलगी भांबावून गेली. तिला जीवन जगणे असह्य झाल्याने दि.18 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजताचे सुमारास विवाहित महिला कोमल हिने आपल्या गावी मलकापूर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनेची माहिती मूर्तकाच्या वडिलांनी महागाव पोलिसांत बयान नोंद झाले. सोमवारी महागाव पोलिसांनी मृतक कोमल हिचे प्रेताचा पंचनामा करण्यास प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सवना ग्रामीण रुग्णालयांमध्ये पाठविले. मृतक महिलेचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कोमलचे प्रेतावर मलकापूर चिखली येथे 19 मे रोजी नातेवाईका समक्ष अंत्यविधी पार पडला. मृतक कोमलच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती आणि सासरे यांच्यावर भारतीय दंड संहिता 108, भारतीय दंड संहिता 3(5) नुसार गुन्हा नोंद झाला आहे.