अॅड. आदित्य माने यांचेवर प्राणघातक हल्ला; दोन आरोपी अटक पुसद वकील संघाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन

मुख्य संपादक मो.9021233696
पुसदः शहरातील तलाव लेआउट मधील एम पी एन कॉन्व्हेंट समोर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना दिनांक १९ मे २०२५ रोजी च्या पावने दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे. प्राण घातक हल्ला करणाऱ्यां दोघांना अटक करण्यात आले. आदित्य माधवराव माने वय ३९ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशिष भानुप्रकाश कदम वय ४० वर्ष राहणार तलाव लेआउट भूषण यशवंत माळोदे वय ३५ राहणार विटाळा वार्ड पुसद यांच्या विरोधात १०९ (१) ११८(१)२९६,३ (५) अशा विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार आदित्य माने हा पुसद मध्ये वकीलीचा व्यवसाय करीत असल्याने आशिष कदम यांचे विरुध्द फिर्यादी आदित्य माने यांनी बऱ्याच प्रकरणात वकील पत्र घेतले आहे. त्यापैकी डॉ. रविन्द्र वडते यांच्यातर्फे आशिष कदम यांचे विरुध्द प्रकरण तसेच आशिष कदम विरुद्ध सतिष शेवाळकर यांचे विरुध्द दिलेल्या प्रकरणरही लढवीत आहे. आशिष कदम यांच्या विरुध्दच्या प्रकरण घेतल्यामुळे न्यायालयात नेहमी रागात बघत होता. असे तक्रारीत नमुद केले आहे दि.१९ मे रोजी रात्री ९:३०ते ९:४५ वाजताच्या दरम्यान आदित्य माने हे जेवण करुन त्यांच्या डॉगला (कुत्रा) घेवुन वॉकींग करिता निघाले असता अॅड. आदित्य माने हे एमपीएन कॉन्व्हेंट पुसद समोरुन रोडने जात असतांना एमपीएन कॉन्व्हेंट शाळेसमोरील रोडवर आशिष कदम यांची चारचाकी कार काळया रंगाची उभी होती. त्यावेळेस आशिष कदम बार कौन्सिलचे त्यांचे सोबत अॅड. शिवाजी खराटे, शिवराज सर्जेराव पाटील व एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ४० वर्षे असे तीन लोक तेथे उभे होते. त्यावेळी शिवाजी खराटे व शिवराज पाटील यांनी अॅड. माने यांना आवाज दिला असता आदित्य माने तेथे थांबले तेंव्हा आशिष कदम हा दुरुनच शिवीगाळ करीत जास्त मोठा वकील झाला का माझ्या विरुध्दच्या प्रकरणे घेण्याची तुझी हिंम्मत कशी झाली. त्यावेळेस आदित्य माने त्याला म्हणाला की माझा हा व्यवसाय आहे मी कुणाचीही प्रकरण घेईन असे बोलल्यानंतर आशिष कदम व त्याचा सोबती त्याच्या कारमध्ये बसले व कार चालु करुन आशिष कदम याने त्यांचे सोबत असलेल्या भूषणला म्हणाला आदित्यच्या, अंगावर कार घालुन याला येथेच जिवाने मारुन टाक तेंव्हा भूषणने माझ्या अंगावर कार आणली. तेंव्हा मी बॉनेटवर घासत गेलो व पुढे भिंत असल्यामुळे त्याने ब्रेक दाबला जिव वाचवीण्यासाठी एम.पी. एन. कॉन्व्हेन्ट च्या मागच्या बाजूला पळालो. तेंव्हा तेथे नाली असल्याने त्याने कार थांबवीली त्यानंतर आशिष कदम व त्याचे सोबती भूषण हा कारखाली उतरला. आशिष कदम याने त्याच्या कारमधुन लोखंडी रॉड काढला व त्याने तो लोखंडी रॉड आदित्य माने च्या डोक्यावर मागच्या बाजुस मारलाने डोके फुटुन रक्त निघु लागले. तेव्हा भूषणच्या हातातील कड्याने आदित्यच्या डोक्यावर कपाळावर मारले. त्यावेळेस शिवाजी खराटे व शिवराज पाटील यांनी आदित्यला त्यांचे तावडीतुन सोडवीले. शिवराज पाटील जखमीला प पोलीस स्टेशन येथे आणले व त्यानंतर क पोलीसांनी सरकारी दवाखाना पुसद य येथे मेडिकलसाठी नेले. सरकारी त दवाखाना येथील डॉक्टरांनी जास्त अ मार असल्याने पुढील उपचारासाठी y अॅड. माने यांना मेडीकेअर स हॉस्पीटल पुसद येथे रेफर केले. य सदर झालेल्या घटनेचा निषेध वकील अ संघ पुसद यांनी उपविभागीय पोलीस क अधिकारी पुसद यांना निवेदन देऊन क सदर आरोपीवर MCOCA (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावे व वकील संघाच्या संरक्षण कायद्यानुसार लवकरात लवकर अंमलबजावणी करण्या संदर्भात शासनाला कळवावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय घिरज बांडे करीत आहे.