आरोग्य
उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात जागतिक डेंग्यू दिना निमित्त मार्गदर्शन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
आज दिनांक 16/5/2025 रोजी उपजिल्हा रूग्णालय उमरखेड येथे मा . जिल्हा
हिवताप अधिकारी डॉ शेख यांच्या आदेशानुसार व सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली “जागतिक डेंग्यू दिन ” कार्यक्रम घेण्यात आला व मार्गदर्शन करण्यात आले. ए बी विणकरे(माजी सैनिक) यांनी डेंग्यू आजार होऊ नये म्हणून प्रतिबंध कसा करावा या विषयी,तसेच कीटकजन्य आजाराबाबत मार्गदर्शन केले .या कार्यक्रमाला आरोग्य कर्मचारी कल्याणदळवी ,बोंबले, मुकाटे व आरोग्य सेवक सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.