Uncategorized

ढाणकीतील तीव्र पाणीटंचाई विरोधात आझाद समाज पार्टी आक्रमक( तात्काळ उपाय योजना आखून टॅंकरने पाणीपुरवठा करा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड..ढाणकी शहरात सध्या भीषण तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून महिन्यातून फक्त एकच वेळ नगरपंचायत कडून पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने पाणीटंचाई विषयी तात्काळ उपायोजना आखून तात्पुरत्या स्वरूपात ढाणकी शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठावा करण्यात यावा अशी मागणी दिनांक 19 मे रोजी आझाद समाज पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कडे निवेदनाद्वारे करण्यात आली,
पाणीटंचाई शहरवासीयांच्या पाचवीलाच पुजलेली आहे, पूर्वी ग्रामपंचायत होती आता नगरपंचायत झाली आता तरी पाणी समस्या मार्गी लागेल अशी आशा नामकीयांना होती मात्र मागील पाच वर्षात नाव्यानेच स्थापन झालेल्या नगरपंचायत प्रशासनाकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना आखल्या नसल्याने घोटभर पाण्यासाठी हातात हंडा घेऊन लहान थोर आबाला वृद्ध तसेच शेतकरी शेतमजूर यांना आपली रोजंदारी बुडवून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, शहरवासीयांना नगरपंचायत प्रशासनामार्फत महिन्यातून एकच वेळ पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे , पाचशे लिटरची पाण्याची टाकी 150 रुपयात विकत घ्यावी लागत असल्याने सर्व सामान्य जनतेला मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करावा की मजुरीच्या पैशातून पाणी विकत घ्यावे असा प्रश्न निर्माण झाला असल्याने नगरपंचायत च्या ढिसाळ कार्यप्रणाली विषयी नागरिकात तीव्र संतापाची लाट आहे, लाखो रुपये खर्च करून ढाणकी ते गांजेगाव येथील पैनगंगा नदीवरून शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ग्रामपंचायत असताना कार्यान्वित करण्यात आली होती परंतु मागील काही वर्षांपासून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नादुरुस्त अवस्थेत आहे, यास नगरपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार व लोकप्रतिनिधीची

उदासीनता जबाबदार असल्याचे जनतेत तीव्र नाराजी आहे, नगरपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ढाणकी शहरात उद्भवलेली पाणीटंचाई तात्काळ दूर करण्यासाठी तातडीने उपायोजना आखून तात्पुरत्या स्वरूपात ढाणकी शहराला टॅंकरने पाणीपुरवठा करावा अन्यथा आजाद समाज पक्षाच्या वतीने नगरपंचायत समोर तीव्र जनांदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात नमूद करण्यात आला यावेळी आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, उमरखेड तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, मार्शल विनोद बर्डे, ऍड इमरान खान, महासचिव सचिन वावळे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!