Uncategorized

खा. हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने उमरखेड येथे एक दिवसीय दिव्यांग शिबिरात 970 लाभार्थ्यांची तपासणी ; गरजूंना मिळणार मोफत साहित्य

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड – ( दि. 01 ) हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी तालुकानिहाय नाव नोंदणी मोजमाप व तपासणी शिबिराचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातील 2 तालुक्यात करण्यात आले आहे. उमरखेड तालुक्यात या शिबिराचे 01 फेब्रुवारी या एक दिवसीय आयोजन जिल्हा परिषद शाळा उमरखेड येथे करण्यात आले होते. यामध्ये 970 च्या वर दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली असून गरजू दिव्यांगाना लवकरच साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.


खासदार हेमंत पाटील यांच्या सौजन्याने भारतीय कृत्रिम अंग निर्माण कानपूर, जिल्हा प्रशासन , जिल्हा परिषद, समाज कल्याण विभाग व गोदावरी फाउंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून २०२०-२१ मध्ये तपासणी करून जवळपास ४ हजारच्या वर दिव्यांग बांधवाना २ कोटी ७७ लक्ष रुपयाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले होते. तश्याच प्रकारचे शिबीर यावर्षी सुद्धा घेण्यात येत आहे, यावेळी, बोलतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रमुख चितांगराव कदम म्हणले की दिव्यांग बांधवांसाठी काम करणारे खासदार हेमंत पाटील हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले खासदार आहेत. आणि यातून जे समाधान मिळते ते जगातील कुठल्याही समाधानापेक्षा वेगळे आहेत.
या शिबिराला उपस्थित


शिवसेना सहसंपर्क प्रमुख्य चितांगराव कदम,तालुका प्रमुख संतोष जाधव,प्रवीण मिराशे,उपतालुक प्रमुख विनायक कदम,तालुका संघटक कपिल चव्हाण,युवासेना जिल्हा संघटक कृष्णा जाधव,युवासेना तालुका प्रमुख विनायक मारडकर,अपंग संघटना जिल्हा प्रमुख विश्वाभर वानखेडे, यवतमाळ जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण,तहसीलदार आनंद देऊळगावकर,गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, मुख्यमंत्री जनकल्याण कार्यलयाचे जगदीश खंडेलवार, दत्तप्रसाद रहाटे, अपंग जिल्हा समन्वयक विष्णू वैरागडे,गजानन मस्के, अलिमको टीमचे डॉ.रुक्मिणी सोनेवाड, डॉ रबिना, वैभवी सावंत, डॉ महेश कुमार, शेख कलीम , ज्ञानेश्वर जाधव, ब्रिजेश सैनी, ओम द्विवेदी, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क अधिकारी चंद्रसेन आढागळे,सावन लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!