Uncategorized

कामधेनु गो शाळेत गोआधारित शेती विषयक एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ढाणकी परिसरात कार्यरत असलेली कामधेनू गोशाळा या ठिकाणी दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी गोआधारित शेती या विषयावर शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. रोशन मेहेर, प्रा. तुषार चव्हाण ,उत्कृष्ट शेतकरी देव मॅडम यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले या कार्यक्रमासाठी डॉ. विद्या कदम सहाय्यक आयुक्त सर्व चिकित्सालय उमरखेड व डॉ. गोपाल ठाकूर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) उमरखेड यांनी कामधेनू गोशाळेत सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कामधेनु गोशाळेचे सचिव दिपक चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले . सदर कार्यक्रमात जवळपास १५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण पूर्ण केले सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांना उत्कृष्ट गो आधारित शेती कशी करावी या विषयावर प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमात अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव व्यक्त केले व प्रशिक्षण मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!