Uncategorized

गृप्ततेचा भंग करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करा…।पोलीस अधिक्षकांकडे शिवसेनेची मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड चे मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी सूर्यास्तानंतर झेंड्याला सलामी न देता झेंडा संहितेचे उल्लंघन केल्यामुळे शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उमरखेड मुख्याधिकारी नगरपरिषद यांची विरुद्ध कारवाईची पोलीस स्टेशन उमरखेड येथे मागणी केली होती तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व विरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली होती त्याची चौकशी पोलीस स्टेशन उमरखेडचे एपीआय पांडुरंग शिंदे यांच्याकडे आली असता त्या प्रकरणात विधी अधिकारी यांचा सल्ला मागितला त्यावरून विधी अधिकारी श्री एस पी चव्हाण यवतमाळ यांनी गोपनीय अहवाल जावक क्रमांक १ / २०० ५ नुसार 12 फेब्रुवारी 2025 रोजी पाठविला सदरचा अहवाल गोपनीय अहवाल असल्याची त्यावर नोंद आहे असे असताना गोपनीय अहवाल श्री नितीन भुतडा यांना कोणी दिला व नितीन भुतडा यांनी पत्रकार परिषदेत गुप्त अहवालाच्या प्रति वाटून सार्वजनिक करून गुप्ततेचा भंग केला . तपास अधिकारी यांचे कर्तव्य तपासातील दस्तऐवज गुप्त ठेवले असतात श्री नितीन भुतडा यांच्याकडे गुप्त अहवाल गेला कसा आहे त्यांना तो कोणी पुरविला याची चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करावी झेंडा प्रकरणात नितीन भुतडा यांच्यावर सुद्धा आरोप होते ज्याच्यावर आरोप आहेत त्यांना मात्र तपासातील गुप्त दस्त मिळविण्याचा कायदेशीर अधिकार नाही . असे असतानाही त्यांच्यावर आरोप केले गेले त्यांनी गुप्त दस्तऐवज पत्रकार परिषद वाटले त्यामुळे या प्रकरणातील गुप्ततेचा भंग करणाऱ्या लोकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाई व्हावी अशी मागणी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे अँड.संजय कुमार जाधव शहर प्रमुख शिवसेना,सपनाताई चौधरी महिला शहरप्रमुख,रविकांत रुडे, राजू गायकवाड,बसवेश्वर शिरसागर यांनी केली आहे
==================(((

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!