Uncategorized

उमरखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीच्या गैर कारभाराविरोधात शिवसेना आक्रमक गैरकारभाराच्या चौकशीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:-येथील नगर परिषदेला मागील ३ वर्षापासुन मुख्याधिकारी हेच कारभार पाहतात. स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यामूळे उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी काही विशिष्ट लोकांच्या सांगण्यावर कामे करीत असुन त्यानी केलेल्या नियमबाहय कामांची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन शिवसेना उमरखेड शहर योच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी याच्याकडे निवेदनातुन करण्यात आली उमरखेड येथे एस. टी. डेपोला लागून शेत स.नं. ३४०/१ ही जमीन आहे. सदर जमीन ही सामाईक क्षेत्रात ४.०१.०० हे. आहे. सदर जमीनीचे लेआऊट पडलेले नाही. परंतु मुख्याधिकारी ज्याचे मर्जीने चालतात त्या बड्या नेत्याने सदर जमीन विकसीत करण्याचे काम घेतले असुन उमरखेड शहरातील अनेक वर्षापासुन कर भरणारे सिद्धेश्वर वार्ड, कारखाना कॉलनी, मखळे लेआऊट, संत गजानन नगरी यामधील लोकांनी अनेक वेळा नगर परीषदेच्या मुख्याधिकारी याना भेटुन रस्त्याची सुधारणा करावी व नाल्याचे व्यवस्थापन करावे यासंदर्भात अनेक अर्ज व निवदने दिलेले असताना सदर भागात मागील २० ते २५ वर्षापासुन वस्ती आहे.
जनहिताचे काम करण्यापेक्षा विशिष्ट लोकाची कामे करण्यामध्ये रस असलेल्या मुख्याधिकारी यांची विभागीय चौकशी करुन त्यांचे विरुद्ध कायदेशिर कारवाई करावी या करीता शिवसेना शहर प्रमुख अॅड. संजिवकुमार जाधव, महिला शहर प्रमुख सपना चौधरी, रविकांत रुडे, अॅड. अजय पाईकराव अनु. जाती तालुका प्रमुख, राजु गायकवाड प्रसिद्धी प्रमुख, अमोल सुर्यवंशी शहर संघटक, सौ. संगिता धाबे महिला शहर संघटक, बसवेश्वर क्षिरसागर उपशहरप्रमुख यांनी जिल्हा अधिकारी यवतमाळ यांच्याकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!