Uncategorized

नादुरस्त स्कुल बसचा वापर करणाऱ्या शाळेवर कार्यवाही करा – पालकांनी केली पोलीसात तक्रार

स्टुडंट वेल्फेअर शाळा प्रशासनाचा विद्यार्थ यांच्या जिवाशी खेळ

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड = मागील महीण्यात स्टुडंट वेल्फेअर इंग्लीश मेडीयम स्कुल च्या बसला झालेल्या अपघातात महीमा सरकाटे या विद्यार्थीनीचा दुर्देवी मृत्यु झाला होता तर या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते हा सर्व प्रकार नादुरस्त स्कुल बस मुळे झाल्याचा ठपका आर टि ओ अहवालातुन ठेवन्यात आलाअसल्याची बाब नुकतीच पुढे आली आहे परंतु शाळा प्रशासनाने मात्र या प्रकरनाला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याची बाब काल सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजीच्या प्रकारातुन पुढे आला असुन
स्टुडंट वेल्फेयर इंग्लिश मेडीयम स्कूल दहागाव, उमरखेड या शाळेची नादुरस्त म्हणजेच वाहतुक करण्यास योग्य नसलेली स्कुलबस
तरोडा, कळमुला, पोफाळी या मार्गावरील विद्यार्थचाना घेण्यासाठी आली होती सदर स्कुल बसची पालकानी पहाणी केली असता स्कूल बस कमांक एम.एच.४० बीजी.१९०९ हि गाडी सकाळी ८ वाजता तरोडा, कळमुला, वसंतनगर, येथील मुले घेवून पोफाळी येथे आलीअसता सदर स्कुल बसची अवस्था ही अतीशय खस्ता असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले यासंबधात पोफाळी येथील उपस्थीत पालकानी सदर स्कुल बसची शुटींग व फोटो घेऊन व्हॉटसप द्वारे समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यात आली असून बस मध्ये मागील बाजूस ३ टायर, ४ ट्यूब बंडल, मोडक्या सीट, डाव्या साईडचा साईड ग्लास नसलेला, टायर रीमोल्ड असलेली खस्ता अवस्थेतील गाडी, व गाडी सोबत मनमंथ बारे हा शाळेचा कर्मचारी वाहकासोबत मुलांना नेण्याकरीता गाडीत आला होता. सदर कर्मचारी व शाळा प्रशासनाला मागील अपघातातील पळशी फाटा येथील कु.महिमा सरकाटे हिचा अपघात ज्या कारणामुळे झाला याची संपूर्ण माहीती असताना देखील त्याचीच पुनरावतृत्ती घडण्याची शक्यता असलेली स्कुल बस पाठवील्याचे पोफाळी येथील जागरुक पालकीच्या लक्षात आले या अगोदर घडलेल्या अपघात प्रकरणानंतर चांगल्या स्थीतीतील बस वापरण्याचे अश्वासन शाळा प्रशासनाने दिले होते त्या अश्वासना प्रमाने न वागता मनमानी पद्धतीने जिवघेण्या बसचा वापर शाळा प्रशासन करीत असल्याचा आरोप पालक वर्गा कडुण करण्यात आला असुन या प्रकाराची तक्रार देखील पालक वर्गानी पोफाळी पोलीसात दिली असुन याप्रकरणी पोफाळी पोलीस काय कार्यवाही करतात याकडे पालक वर्गाचे लक्ष लागले असुन अशा प्रकारे अव्यवस्थीत व नादुरस्त बसमध्ये मुलाना शाळेत कसे पाठवावे व शाळेत नाही पाठवीले तर होणाऱ्या शैक्षणीक नुकसानीची जबाबदार कोण घेणार यासह विवीध प्रश्न पालक वर्गातुन यानिमीत्ताने उपस्थीत केल्या जात आहेत . याप्रकरणी जागरूक पालकांनी आरटीओ यवतमाळ यांच्याकडे देखील तक्रार अर्ज दिला असुन कार्यवाही ची मागणी केली आहे .

चौकट : दंडात्मक कार्यवाही करू

मागील महीन्यात या शाळेच्या बसच्या अपघात प्रकरणानंतर आम्ही शाळा प्रशासनाला नादुरुस्त बस न वापरण्याबाबत सूचना दिली होती परंन्तु शाळा प्रशासन दिलेल्या सूचनेचे पालन करीत नसेल तर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!