सामाजिक

रेशीम सुतनिर्मिती चे प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

“सत्यशोधक शेतकरी संघाची वचनपूर्ती साठी वाटचाल”
नितीन माहेश्वरी.

चौकट : शेतकरी सर्वांचे पोट झाकण्यासाठी कष्ट करतात त्यांचे पोट भरणे हे आपले कर्तव्य समजून, सोलर वर चालणाऱ्या रेशीमधागा निर्मिती मशीन द्वारे महिलांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगरातून समृध्दीची वाटचाल करावी.
डॉ. प्रेम हनवते,
संशोधन अधिकारी,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी पुणे.

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192


उमरखेड सप्टेंबर महिन्यात रेशीम दिनाचे औचित्य साधून या निमित्त स्वयंरोजगरातून समृध्दी कडे शेतकरी वळला पाहिजे या करिता डॉ. प्रेम हनवते यांच्या पुढाकारातून कृषी महाविद्यालय आणि भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने, कृषी महाविद्यालय उमरखेड येथे
रेशीम उद्योग कार्यशाळेत लाभार्थ्यांना सोलर वर चालणाऱ्या मशीनद्वारे रेशीम धागा निर्माण करण्याचे प्रात्यक्षिका द्वारे प्रशिक्षण दिनांक ४ सप्टेंबर रोजी कृषी महाविद्यालय कुपटी येथे पार पडले या कार्यशाळेचे उद्घाटन सत्यशोधक शेतकरी संघाचे कार्याध्यक्ष नितीन माहेश्वरी तर अध्यक्ष स्थानी यवतमाळ चे जिल्हा रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे होते, या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन म्हणून रेशीम सूत्र नवी दिल्लीचे सेल्स मॅनेजर शिव कुमार, आणि यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे टेक्सटाइल विभागाचे प्रोफेसर
डॉ. संदीप सोनी यांनी प्रत्यक्षात रेशीम कोषापासून धागा काढून प्रशिक्षणार्त्यांना मशिन हाताळण्याची मुभा देण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. वि. ना. कदम, दुग्ध संकलन प्रमुख व सत्यशोधक शेतकरी संघाचे देवानंद मोरे, भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेती मित्र अशोक वानखेडे,उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अनिल वाढवे, रामदास इटकरे, माधुरी दळवी,रेशीम विभागाचे उमरखेड येथील तांत्रिक अधिकारी कुंदन चव्हाण,कृषी महाविद्यालय उमरखेड चे प्राचार्य डॉ. आर. एम. खान, रेशीम उत्पादक शेतकरी सिद्धेश्वर बिच्चेवार उपस्थित होते. यावेळी नितीन माहेश्वरी यांच्या हस्ते रेशीम रिलिंग मशीनचे बटन दाबून उदघाट्न करण्यात आले.


रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी तयार झालेले कोष आपल्या घरी महिलांनी देऊन रिकाम्या वेळी घरीच्या घरी रेशीम सुत निर्माण करून स्वयंरोजगार करावा, त्यांच्या प्रयत्नांना सहकार महर्षी भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी आवश्यक ते पाठबल देईल असे उद्घाटन प्रसंगी नितीन माहेश्वरी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून इतिहास अभ्यासक डॉ. प्रेम हनवते यांनी वैदिक काळात गृत्समद ऋषीनी लांब धाग्याच्या कापसाचा शोध लावून विदर्भाच्या भूमीत कापसाची लावगड करून वस्त्रासाठी पहिल्यांदा कापसापासून धाग्याची निर्मिती केली. ते गृत्समद ऋषी यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचे होते.इतिहासातील पहिला कापसाचा धागा काढण्याचा मान यवतमाळ जिल्ह्याला जातो त्याच प्रमाणे कोषा पासून रेशमाचा पहिला धागा काढण्याचा बहुमान देखील आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडला मिळाला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालेल्या उपस्थित शेतकऱ्यांनी रेशीम कोष उत्पादनावर न थांबता प्रत्यक्ष रेशीम सूत निर्मिती करून आपली प्रगती करून घ्यावी असे आवाहन केले उमरखेड – महागाव भागात शेतकऱ्यांसाठी “सिल्क आणि मिल्क” संकल्पना प्रत्यक्षात रुजविण्याचा भाग म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास शिंदे (जिल्हा रेशीम विकास अधिकारी )यांनी शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे फायदे सांगून यातून शाश्वत विकास साधावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रा. आनंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा. शिरफुले सर, प्रा. आनंद राऊत, किशोर चव्हाण, अनिल इंगळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी उमरखेड तालुक्यातील 60शेतकरी आणि 20उमेद च्या कृषी सखी यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button