विधान परिषदेवर अजित पवार गटा कडुन युसुफ पुंजानी यांची निवड करण्याची मागणी

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
कळमनुरी/ राज्यात विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषद सदस्यांची निवड होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन सदस्य मिळण्याची शक्यता आहे यापूर्वी ११ विधान परीषद सदस्या ची निवड झाली त्यात एक पक्षाने मुस्लिम समाजाचे विचार केला नाही म्हणून मुस्लिम समाजात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे
म्हणून आता पुढे होणाऱ्या विधान परिषद राज्यपाल नियुक्त १२ सदस्या मध्ये मुस्लिम समाजाला संधी देण्यात यावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे कडुन मुस्लिम चेहारा म्हणून कारंजा चे माजी नगराध्यक्ष वाशिम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी यांची निवड करण्यात यावी अशी मागणी कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी केली आहे
युसुफ पुंजानी हे कारंजा विधानसभा निवडणुकीत तीन वेळेस कमी मतांनी पराभव झाला होता ते कारंजा नगरपरिषदे चे नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून अनेक वर्षापासून जनतेचा काम केले आहे संध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे वाशीमचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहे वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद निर्माण केली आहे राष्ट्रवादी मय वातावरण निर्माण केलेले आहे युसुफ पुंजानी यांना विधान परिषद सदस्य म्हणून निवड केल्यास विदर्भ व मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये बळ मिळेल म्हणून युसुफ पुंजानी यांची विधान परिषद सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड करावी अशी मागणी कळमनुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे