Uncategorized

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा होणार डॉक्टर

आदर्श गाव पिंपळदरी येथील अभिषेक कबले याचा डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव येथे MBBS साठी प्रवेश निश्चित,

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

तालुक्यातील आदर्श गाव पिंपळदरी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर होणार आहे,अभिषेक भुजाजी कबले असे त्याचे नाव असून घरची परिस्थिती बेताचीच आई-वडील शेतकरी अनेक अडचणी असतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभिषेक कबले याने पहिल्याच प्रयत्नात ‘नीट’ परीक्षेत 424 गुण घेऊन डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित केला आहे.अभिषेकचे प्राथमिक शिक्षण हे पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा परभणी येथे झाले,अभिषेकचे आई वडील हे अल्पशिक्षितच माळरानात डोंगरावर असलेली मोजकीच शेती त्यामध्ये नापिकी, कुटुंबाचा खर्च भागणे अवघड बनल्याने त्यांनी कधी ऊसतोडणीचे काम केले तर कधी हळद काढणी करून मुलाच्या शिक्षणात परिस्थितीला आड येऊ दिले नाही,काबाडकष्ट करून मुलाला शिकवले त्यामुळेच आज मुलाच्या यशामुळे कबले कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अभिषेक कबले याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशाने त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

चौकट-:पिंपळदरी येथील डॉक्टर चंद्रकांत रिठे उमरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राम्हणगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देत आहेत, डॉक्टर रिठे यांनी वेळोवेळी अभिषेक कबले याला मार्गदर्शन केले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!